Thursday, May 7, 2026
Homeएरंडोलएरंडोल येथे टँकरच्या धडकेत दोन जण ठार

एरंडोल येथे टँकरच्या धडकेत दोन जण ठार

जळगाव प्रतिनिधी :-एरंडोल शहरातील अमळनेर नाक्याजवळ रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास भरधाव टँकरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन जण ठार झाल्याचे घटना  घडली. अपघाताच्या घटनेनंतर नागरिकांनी रोष व्क्त करून महामार्ग काही काळ रोखून ठेवला. यामुळे बराच वेळ दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली होती.

राजू भिला भोई वय 46 रां. एरंडोल आणि दीपक रामकृष्ण मोरे वय 34 शिरसोली ता जळगाव असे मयत व्यक्तींची नावे असून दोन्ही एकमेकांचे साडू होते. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की राजू भोई यांच्या पुतणीचे सोमवारी लग्न असल्याने रविवारी हळदीचा कार्यक्रम झाला यानंतर राजू भोई व दीपक मोरे घराकडे जात असताना टँकर क्रमांक एम एच 19 बीपी 2003 ने अमळनेर नाक्याजवळ दुचाकीला जोरदार धडक दिल्याने यात राजू भोई जागेस ठार झाले तर दीपक मोरे यांचा एरंडोल ग्रामीण रुग्णालय येथे उपचार दरम्यान मृत्यू झाला. या प्रकारे टँकर चालकाविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी टँकर जप्त केला आहे. दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे लग्न घरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघात प्रकरणी नाही चे प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांच्यावर सदस मनुष्यवताचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत एरंडोल वासियांनी महामार्गावर आंदोलन केले.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या