Wednesday, August 26, 2026
Homeखानदेशकन्हेर येथे बोरी नदीवर ब्रीज-कम-बंधाऱ्याला मुख्यमंत्र्यांची मंजुरी

कन्हेर येथे बोरी नदीवर ब्रीज-कम-बंधाऱ्याला मुख्यमंत्र्यांची मंजुरी

कन्हेर येथे बोरी नदीवर ब्रीज-कम-बंधाऱ्याला मुख्यमंत्र्यांची मंजुरी

कोल्हापूर बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसंदर्भातील बैठकीत गिरीश महाजन यांचे सादरीकरण; कामाला गती देण्याचे निर्देश

प्रतिनिधी | जळगाव

अमळनेर तालुक्यातील कन्हेर येथे बोरी नदीवर प्रस्तावित ब्रीज-कम-बंधारा उभारण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी महत्त्वपूर्ण निर्देश दिले. महाराष्ट्रातील नादुरुस्त कोल्हापूर बंधाऱ्यांच्या दुरुस्ती आणि जलसंधारण कामांचा आढावा घेण्यासाठी मुंबई येथे आयोजित बैठकीत या कामाचे सादरीकरण करण्यात आले.

विधानमंडळातील मंत्रिमंडळ बैठक कक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एल-निनोमुळे राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीवर आणि त्यावरील उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कन्हेर येथील बोरी नदीवरील ब्रीज-कम-बंधाऱ्याच्या कामाचे छायाचित्रांसह सादरीकरण केले.

बैठकीत जलसंपदा विभागातील उपलब्ध निधी, संबंधित जिल्ह्याचा जिल्हा नियोजन निधी तसेच मदत व पुनर्वसन विभागाच्या निधीतून आवश्यक आर्थिक तरतूद करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यापूर्वी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्राप्त निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाने काही कामे पूर्ण केल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

या बैठकीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार मंगेश चव्हाण, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद-सिंघल, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नियोजन विभागाच्या सचिव शैला ए. तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी कन्हेर येथील ब्रीज-कम-बंधारा प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश देत जलसंधारणाच्या दृष्टीने अशा प्रकल्पांना प्राधान्य देण्याचे संकेत दिले. या प्रकल्पामुळे परिसरातील जलसाठा वाढण्यास, भूजल पातळी उंचावण्यास आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या