Wednesday, July 1, 2026
Homeखानदेशवाघुर ३३ केव्ही वीजवाहिनीच्या दुरुस्तीसाठी ४ जुलैला शटडाऊन

वाघुर ३३ केव्ही वीजवाहिनीच्या दुरुस्तीसाठी ४ जुलैला शटडाऊन

वाघुर ३३ केव्ही वीजवाहिनीच्या दुरुस्तीसाठी ४ जुलैला शटडाऊन

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर देखभाल कामासाठी महावितरणला मनपाची ना-हरकत

जळगाव | प्रतिनिधी

वाघुर धरण परिसरातील पंपिंग स्टेशन आणि उमाळा जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी वाघुर ३३ केव्ही उच्चदाब वीजवाहिनीवरील देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने महावितरणला ४ जुलै २०२६ रोजी शटडाऊन घेण्यास ना-हरकत दिली आहे.

एमआयडीसी परिसरातून वाघुर पंपिंग स्टेशनपर्यंत सुमारे २८ किलोमीटर लांबीची वीजवाहिनी टाकण्यात आली असून, याच वाहिनीद्वारे पंपिंग स्टेशनला वीजपुरवठा केला जातो. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या वीजवाहिनीवरील आवश्यक दुरुस्तीची कामे करणे अत्यावश्यक असल्याचे पाणीपुरवठा विभागाने नमूद केले आहे.

महावितरणला शनिवार, ४ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ५ वाजेपर्यंत वाघुर ३३ केव्ही उच्चदाब वीजवाहिनीचा वीजपुरवठा बंद ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. संबंधित दुरुस्तीची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करून वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊ नये, यासाठी कामे वेळेत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, जळगाव महानगरपालिका यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या