Thursday, May 7, 2026
Homeआणखीवासुदेव आला रे, वासुदेव आला !गुलाबभाऊंच्या साथीनं धनुष्यबाण आला !"

वासुदेव आला रे, वासुदेव आला !गुलाबभाऊंच्या साथीनं धनुष्यबाण आला !”

गावा -गावात वासुदेवांचा गजर : गुलाबभाऊंच्या प्रचाराचा नवीन फंडा !”

जळगाव/धरणगाव ;-  जळगाव ग्रामीण मतदारसंघात महायुतीचे उमेदवार व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांच्या प्रचारार्थ वासुदेवांचा रंगीबेरंगी फंडा आता गावोगावी गाजत आहे. “वासुदेव आला रे, वासुदेव आला!” या उत्साही गजरात, वासुदेवांनी धनुष्यबाणाच्या प्रचाराची धूमधडाका उडवून दिला आहे.

हातात चिपळ्या, गळ्यात गजरा आणि मुखावर आत्मीयतेचा भाव, वासुदेवांचा ताफा प्रत्येक गावात थेट चौका – चौकात, घराघरात जाऊन प्रचार करत आहे. त्यांच्या गीतांमधून गुलाबभाऊंच्या विकासाचा व धनुष्यबाणाचा इतिहास उलगडत आहे.

वासुदेवांचा प्रचार फंडा म्हणजे शिवसेनेची आपुलकीची आणि हृदयाला भिडणारी प्रचार शैली आहे. “गुलाबराव पाटील म्हणजे ‘हक्काचा आपला माणूस’, तुमच्यासाठी उभा राहणारा नेता,” असा ठसा त्यांच्या गीतांतून उमटत आहे.

वासुदेवांचा आवाज, चिपळ्यांचा ताल आणि त्यांच्या उत्साही गजरामुळे गावा- गावात धनुष्यबाणाच्या प्रचाराला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे गुलाबराव पाटील यांच्या विजयासाठी जळगाव ग्रामीण मतदारसंघातील वातावरण शिवसेनेच्या रंगात रंगले आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या