Tuesday, November 24, 2026
Homeक्राईमदुचाकी चोराचा पर्दाफाश; बऱ्हाणपूरच्या आरोपीकडून २.३२ लाखांच्या ९ मोटारसायकली जप्त

दुचाकी चोराचा पर्दाफाश; बऱ्हाणपूरच्या आरोपीकडून २.३२ लाखांच्या ९ मोटारसायकली जप्त

दुचाकी चोराचा पर्दाफाश; बऱ्हाणपूरच्या आरोपीकडून २.३२ लाखांच्या ९ मोटारसायकली जप्त

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव शहरातून ९ दुचाकी चोरणाऱ्या मध्य प्रदेशातील संशयित चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि जळगाव शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने अटक केली आहे. गोकुळ साहेबराव पाटील (वय ४५, रा. बोरसर, ता. जि. बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून सुमारे २ लाख ३२ हजार रुपये किमतीच्या ९ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे जळगाव शहर पोलीस ठाण्यातील ८ आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील १ असे एकूण ९ गुन्हे उघडकीस आले आहेत.

बळीराम पेठेतून बजाज प्लॅटिना लंपास ३० ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ ते २.२० वाजेदरम्यान बळीराम पेठेतील गोपाल स्टेशनरीसमोरील सार्वजनिक ठिकाणावरून काळ्या रंगाची बजाज प्लॅटिना मोटारसायकल (क्रमांक एमएच १९ ईएम २३३०) अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.

सीसीटीव्ही व तांत्रिक तपासातून आरोपी जाळ्यात दुचाकी चोरीच्या या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना समांतर तपासाचे आदेश दिले. त्यानुसार एलसीबी आणि शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून गोकुळ पाटील याला ताब्यात घेण्यात आले.

चौकशीदरम्यान त्याने बळीराम पेठेतील दुचाकी चोरल्याची कबुली दिली. सखोल तपासात त्याने शहरातील अन्य ठिकाणांहून आणखी ८ दुचाकी चोरल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याच्याकडून सर्व ९ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. एलसीबीचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व शहर पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, अतुल वंजारी, प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, प्रदीप सपकाळे, विजय पाटील, अक्रम शेख, किशोर पाटील, छगन तायडे, राहुल रगडे, रवींद्र कापडणे, रिजवान शेख तसेच जळगाव शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या