Saturday, June 20, 2026
Homeक्राईमप्लास्टिक भंगारला भीषण आग; पाच अग्निशमन बंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रण

प्लास्टिक भंगारला भीषण आग; पाच अग्निशमन बंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रण

प्लास्टिक भंगारला भीषण आग; पाच अग्निशमन बंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रण

जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील घटना

जळगाव | प्रतिनिधी जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात निलांबरी हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या मुस्कान प्लास्टिक भंगार गोदामातील प्लास्टिक स्क्रॅपच्या ढिगाऱ्याला शुक्रवारी दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीमुळे आकाशात धुराचे प्रचंड लोट पसरले होते. मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

प्राथमिक माहितीनुसार, गोदामाशेजारील विद्युत डीपीमधून पडलेल्या चिंगारीमुळे प्लास्टिक भंगाराला आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. प्लास्टिक स्क्रॅप मोठ्या प्रमाणावर असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. दाट धूर आणि वाढत्या ज्वाळांमुळे आग विझविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन केंद्र, गोलाणी फायर स्टेशनच्या दोन गाड्या, महाबळ फायर स्टेशन आणि शिवाजीनगर फायर स्टेशनच्या गाड्या अशा एकूण पाच अग्निशमन बंबांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविले.

आग वेळीच आटोक्यात आल्यामुळे ती आसपासच्या वस्ती व इतर मालमत्तेपर्यंत पोहोचली नाही. अन्यथा मोठ्या प्रमाणावर वित्तहानीसह जीवितहानी होण्याची शक्यता होती. या आगीत अंदाजे तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चालक युसुफ पटेल, प्रकाश चव्हाण, गोविंद माळी, मयूर देसले, प्रभाकर पाटील तसेच फायरमन संजय तायडे, योगेश पाटील, रवींद्र बोरसे, नितीन ससाने, योगेश कोल्हे, राकेश सोनवणे, सौरभ चिकटे, केतन पाटील, किरण पाटील, रुपेश पाटील, ललित पाटील, रितेश उबाळे, विनोद कोळपे, राहुल फुलपगारे आणि लखन माळी यांनी अथक प्रयत्न करून आग पूर्णपणे विझवली.

अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा धोका टळला
प्लास्टिक भंगारामुळे आग झपाट्याने पसरत असताना अग्निशमन दलाने वेळेत घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून अग्निशमन दलाच्या कार्याचे कौतुक होत आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या