Saturday, October 4, 2025
Homeखानदेशस्व. गोदावरी आई पाटील अनंतात विलीन

स्व. गोदावरी आई पाटील अनंतात विलीन

स्व. गोदावरी आई पाटील अनंतात विलीन
आप्तेष्टांच्या अश्रुंचा बांध फुटला ; हजारोंकडून आदरांजली
जळगाव- गोदावरी परीवाराच्या आधारस्तंभ श्रीमती गोदावरी आई वासुदेव पाटील (वय 93) यांचे भास्कर मार्केट येथील निवासस्थानी दि. 3 रोजी दुपारी 1.34 वा. वृध्दापकाळामुळे निधन झाले. गुरूवारी दुपारी 12.30 वा. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्यासह उपाध्यक्ष सुभाष पाटील यांनी त्यांना अग्नीडाग दिल्यानंतर गोदावरी आई अनंतात विलीन झाल्या. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात शोकाकुल वातावरणात पुरोहितांच्या वेदमंत्रोच्चारात स्व. गोदावरी आईंवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिवारासह आप्तेष्टांच्या अश्रुंचा बांध फुटला.

गोदावरी परीवाराचा आधारवड असलेल्या श्रीमती गोदावरी आई पाटील यांना 3 सप्टेंबर रोजी दुपारी 1.34 वा. देवाज्ञा झाली. गुरूवारी भास्कर मार्केट येथील निवासस्थानापासून ते डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय परिसरातून गोदावरी आई यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी गोदावरी आईंच्या पार्थिव देहावर पुष्पवृष्टी अर्पण करण्यात आली. तसेच भजनी मंडळाकडून भजनही करण्यात आले. याप्रसंगी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय परिसरात स्व. गोदावरी आई यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

यावेळी परीवारातील मार्तंड भिरूड, प्रा. डॉ. सुषमा पाटील, डॉ. वर्षा पाटील, प्रमिला भारंबे, सुधाकर भारंबे, डॉ. किरण भिरूड, डॉ. अंजली भिरूड, सरला भिरूड, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. अनिकेत पाटील, डॉ. अक्षता पाटील, अनिल पाटील, डॉ. सुहास बोरले, डॉ. सुरेखा बोरले, डॉ. समर पाटील, डॉ. अस्मिता पाटील, रूपाली चौधरी, जामनेरच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन, महामंडलेश्‍वर जनार्दन हरी महाराज, पवनकुमार महाराज, नवनित महाराज, शाम चैतन्य महाराज, कुंडलेश्‍वर धामचे भरत बेडीकर महाराज, आमदार अमोल जावळे, आमदार राजूमामा भोळे, माजी आयजी बी.जी. शेखर, माजी आमदार लताताई सोनवणे, माजी आ. रमेश चौधरी, माजी आ. अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. जी.एन. पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, बाफना ज्वेलर्सचे सुशील बाफना, संजयदादा गरूड, रमण भोळे, डॉ. राजेंद्र फडके, डॉ. अर्जुन भंगाळे, माजी महापौर आशाताई कोल्हे, सिंधुताई कोल्हे, चंदन कोल्हे, राधा कोल्हे, दीपिका चौधरी, विष्णू भंगाळे, भागवत भंगाळे, मल्टीमिडीया फिचर्सचे सुशील नवाल, अरूणाताई शिरीष चौधरी, उदयसिंह पाटील, रमेश महाजन, अर्जुन चौधरी, शरद जिवराम महाजन, सुरेश धनके, जगदीश फिरके, दिनेश भंगाळे, कुंटुंबनायक ललितदादा पाटील, सुहास चौधरी, अनिल वारके, संजय पाटील, अनिल लढे, लिलाधर चौधरी, अजय भोळे, वासुदेव बोंडे, अ‍ॅड. रवींद्रभैय्या पाटील, अजबराव पाटील, अ‍ॅड. संदीपभैय्या पाटील, सुधाकर चौधरी, हभप भरत महाराज, हभप ऋषिकेश महाराज, मुकुंदा रोटे, सुनील महाजन, सुरेश पाटील, शिवसेनेच्या शुभांगी पाटील, राजेश कोतवाल, वासुदेव भिरूड, विनोद शिंदे, डॉ. राधेशाम चौधरी, राजेंद्र नन्नवरे, अतुलसिंह हाडा, बंडुदादा काळे, लालचंद पाटील, दै. लोकमतचे संपादक किरण अग्रवाल, व्यवस्थापक गौरव रस्तोगी, दै. दिव्यमराठीचे श्रीकांत धनके, ईश्‍वर पाटील, दै. देशदूतचे संपादक हेमंत अलोने, वितरण व्यवस्थापक विजय महाजन, दै. देशोन्नतीचे आवृत्तीप्रमुख मनोज बारी, दै. नवराष्ट्रचे संपादक विकास भदाणे, दै. साईमतचे संपादक प्रमोद बर्‍हाटे, दै. लोकशाहीचे संपादक राजेश यावलकर, प्रसाद जोशी, लाईव्ह ट्रेन्डचे संपादक शेखर पाटील, जळगाव लाईव्हचे डॉ. युवराज परदेसी, सागरमल जैन, सुधाकर बारी, शांताराम गुजर, प्रदीप लोढा, दगडू पाटील, यु.यु. पाटील, गोकुळ भोळे, करीम सालार, अजिज सालार, ज्ञानेश्‍वर महाजन, दारा मोहम्मद, प्रदीप पवार, सुलोचना वाघ, तिलोत्तमा पाटील, वासुदेव नरवाडे, नरेंद्र नारखेडे, पी.आर. चौधरी, डॉ. अनिल पाटील, वसंतराव कोल्हे, डी.के. पाटील, आर.जी. पाटील, रविंद्र नाना पाटील, के. बी. पाटील, पी.ई. तात्या पाटील, राजीव पाटील, एस.डी. चौधरी, सुभाबाई सुरवाडे, गोकुळ सुरवाडे, डॉ. प्रशांत भोंडे, नवल पाटील, आबा पाटील, संदीप सोनवणे, अरविंद विखे, उदय विखे, डॉ. सतीश पाटील, जगन सोनवणे, गोदावरी शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी यांच्यासह हजारो मान्यवरांनी स्व. गोदावरी आई यांना आदरांजली अर्पण केली.
माजी राष्ट्रपतींचा शोकसंदेश
देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा शोकसंदेश प्राप्त झाला होता. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी शोकसंदेशाचे वाचन केले.

ताज्या बातम्या