Wednesday, April 29, 2026
Homeक्राईमघरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन

घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन

घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन

सिलेंडर साठेबाजी व अवैध वापरावर प्रशासनाची करडी नजर

जळगाव | प्रतिनिधी : पश्चिम आशिया प्रदेशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरची संभाव्य टंचाई टाळण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर, साठेबाजी किंवा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या आदेशानुसार या विशेष भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. गॅस सिलेंडरचा गैरवापर किंवा साठेबाजी होऊ नये यासाठी पथकाकडून विविध ठिकाणी अचानक तपासणी केली जाणार आहे.

पथकात विविध अधिकाऱ्यांचा समावेश
या भरारी पथकात तहसीलदार, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्यासह बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीएल कंपन्यांचे सेल्स अधिकारी, तसेच पुरवठा विभागाचे निरीक्षण अधिकारी व पुरवठा निरीक्षक यांचा समावेश करण्यात आला आहे.

तक्रारींसाठी हेल्पलाईन
घरगुती गॅस पुरवठ्याबाबत नागरिकांना काही तक्रार असल्यास ०२५७-२२२३१८० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा किंवा dsojalgaon1@gmail.com या ई-मेलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या