Thursday, May 7, 2026
Homeक्राईमघरात कुणी नसताना १५ वर्षीय मुलीची आत्महत्या; कारण अस्पष्ट

घरात कुणी नसताना १५ वर्षीय मुलीची आत्महत्या; कारण अस्पष्ट

घरात कुणी नसताना १५ वर्षीय मुलीची आत्महत्या; कारण अस्पष्ट

जळगाव : शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने घरात एकटी असताना गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना २ सप्टेंबर रोजी उघडकीस आली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मृत मुलीचे नाव जयश्री लक्ष्मण चव्हाण (वय १५) असे आहे. जयश्रीची आई रोजंदारीच्या कामावर गेली होती, तर लहान भाऊ शिकवणीसाठी बाहेर गेला होता. संध्याकाळी शेजारील मुलींसोबत तिने गणपतीसाठी दुर्वा आणल्या. त्यानंतर पाय दुखत असल्याने गोळ्या आणल्या. मात्र काही वेळातच तिने राहत्या घरात गळफास घेतला.

आजोबा घरी आले असता मुलगी गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तत्काळ तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास पो.उ.नि. अशोक काळे करीत आहेत. मुलीच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या