Saturday, October 4, 2025
HomeBlogयावल तालुक्यात तरुणाचा निर्घृण खून ; आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर

यावल तालुक्यात तरुणाचा निर्घृण खून ; आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर

यावल तालुक्यात तरुणाचा निर्घृण खून ; आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर

यावल प्रतिनिधी तालुक्यातील विरावली-दहिगाव रस्त्यावर इम्रान युनूस पटेल (२१, मूळ रा. हनुमंतखेडा, ता. धरणगाव) या तरुणाची गुरुवारी रात्री निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना समजताच परिसरात खळबळ उडाली.

इम्रान काही दिवसांपासून दहिगाव येथे आपल्या मामाकडे राहत होता. रात्री गावाजवळील रस्त्यावर त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे खुनानंतर अवघ्या काही तासांतच दोन तरुण संशयित – ज्ञानेश्वर गजानन पाटील (१९) आणि गजानन रवींद्र कोळी (१९) – स्वतः मोटारसायकलवरून यावल पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

जळगाव जिल्ह्यात अलीकडेच जामनेर तालुक्यातील खून प्रकरणानंतर पुन्हा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यावल पोलिसांकडून या खुनामागील कारणाचा शोध घेतला जात आहे.

ताज्या बातम्या