Thursday, May 7, 2026
Homeक्राईमदुचाकीच्या चाकात साडी अडकल्याने अपघातामध्ये पहूर येथील महिलेचा मृत्यू 

दुचाकीच्या चाकात साडी अडकल्याने अपघातामध्ये पहूर येथील महिलेचा मृत्यू 

दुचाकीच्या चाकात साडी अडकल्याने अपघातामध्ये पहूर येथील महिलेचा मृत्यू

सिल्लोड येथील दुर्दैवी घटना

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी कामानिमित्त सिल्लोड येथे दुचाकीने मुलासोबत जाणाऱ्या पहूर येथे राहणाऱ्या 48 वर्षीय महिलेचा पदर चाकात अडकून झालेल्या अपघातात महिलेच्या डोक्याला जबर मार लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 30 रोजी दुपारी घडली. यामुळे पहूर परिसरात व्यक्त होत आहे.

मनीषा कैलास चौधरी असे मयत महिलेचे नाव आहे. मनीषा चौधरी या त्यांचा मुलगा ऋषी चौधरी याच्यासोबत छत्रपती संभाजी नगर मधील सिल्लोड येथे प्लॉटच्या कामानिमित्त दुचाकी ने जात असताना अचानक त्यांची साडी दुचाकीच्या चाकात अडकून झालेल्या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना उपचारासाठी सिल्लोडच्या रुग्णालयात दाखल केले असता अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान  मृत्यू झाला. दरम्यान मनीषा चौधरी या पहूर येथील जळगाव मार्गावर वास्तव्याला होत्या. त्यांच्या या अचानक झालेल्या मृत्यूमुळे परिसरात व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पती दोन मुले सून नातू असा परिवार आहे.

 

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या