Saturday, May 2, 2026
Homeताज्या बातम्याचकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा ; पोलीस जवान शहीद

चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा ; पोलीस जवान शहीद

दंतेवाडा : छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बस्तर भागातील चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले. या धूमश्चक्रीत जिल्हा राखीव दलाचा एक पोलीस जवानही शहीद झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रविवारी दिली.

दक्षिण अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाकडून शुक्रवारपासून नक्षलविरोधी अभियान राबविले जात आहे. शनिवारी सायंकाळी नारायणपूर व दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेजवळील जंगलात या पथकावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. त्याला सुरक्षा दलानेही प्रत्युत्तर दिले. त्यानंतर बराच वेळ थांबून थांबून चकमकी सुरू राहिल्या. गोळीबार थांबल्यानंतर शोध मोहिमेत सुरक्षा दलाला नक्षलवाद्यांचे ४ मृतदेह आढळून आले. घटनास्थळाहून एक एके-४७ रायफल व एक सेल्फ लोडिंग रायफलसह इतर स्वयंचलित शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या चकमकीत जिल्हा राखीव दलाचे हेड कॉन्स्टेबल सन्नू करम शहीद झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. अजूनही या भागात शोध अभियान सुरूअसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उल्लेखनीय बाब म्हणजे, राज्यभरातील नक्षलवादविरोधीत अभियानादरम्यान उडालेल्या विविध चकमकीत सुरक्षा दलाने गतवर्षी एकूण २१९ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. यापूर्वी २२ नोव्हेंबर रोजी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील चकमकीत सुरक्षा दलाने १० नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. त्यावेळी मोठा शस्त्रसाठा व दारुगोळा जप्त करण्यात आला होता.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या