Wednesday, January 22, 2025
HomeBlog२१ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा : जळगाव व नंदुरबार केंद्रातून 'चिमी'...

२१ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा : जळगाव व नंदुरबार केंद्रातून ‘चिमी’ प्रथम

२१ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा : जळगाव व नंदुरबार केंद्रातून ‘चिमी’ प्रथम
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजन
जळगाव I प्रतिनिधी
२१ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत जळगाव व नंदुरबार केंद्रातून जीवन विकास सामाजिक संस्था अंतर्गत नानासाहेब आर. बी. पाटील विद्यालय, जळगाव या संस्थेच्या चिमी या नाटकाला प्रथम पारितोषिक, सातपुडा शैक्षणिक व सामाजिक बहुउद्देशीय संस्था, सांगरखेडा, शहादा, नंदुरबार या संस्थेच्या ए आय या नाटकास द्वितीय पारितोषिक तसेच श्री फाऊंडेशन चाटे स्कूल, वरणगाव या संस्थेच्या चिंगी या नाटकासाठी तृतीय पारितोषिक आणि महाराणा प्रताप विद्यालय, भुसावळ या संस्थेच्या झेप या नाटकासाठी चतुर्थ पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी आज एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या चारही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.


सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे जळगाव व नंदुरबार केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे- दिग्दर्शन: प्रथम पारितोषिक प्रदिप भोई (नाटक – चिमी), द्वितीय पारितोषिक रोहिणी निकम ( नाटक – ए आय), तृतीय पारितोषिक अजय पाटील (नाटक- चिंगी) प्रकाश योजना: प्रथम पारितोषिक प्रांजल पंडित (नाटक- चिमी), द्वितीय पारितोषिक राजेश जाधव (नाटक- कस्तुरी), नेपथ्य: प्रथम पारितोषिक मुकेश राठोड (नाटक- चिमी), द्वितीय पारितोषिक प्रणव जाधव (नाटक- दित्वाऱ्या), रंगभूषा : प्रथम पारितोषिक पंकज साखरे (नाटक- झेप), द्वितीय पारितोषिक शितल नेवे (नाटक- चिमी) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक: गगनदिप पवार (नाटक- चिमी) व वृषाली पाटील ( नाटक – चिमी), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे त्रिशा पठाळे (नाटक- चिंगी), पूर्वा जाधव (नाटक- ए आय), मृणाली भामरे (नाटक- कस्तुरी), ध्रुवी कारळे (नाटक- वडाळा ब्रिज), भाग्यश्री ओगले (नाटक – सावली), पार्थ चौधरी (नाटक- शोध अस्तित्वाचा), प्रभुदत्त दुसाने (नाटक- दित्वाऱ्या), पारस पाटील (नाटक- माणसा सावध हो), चिन्मय पाटील (नाटक- आम्ही ध्रुव उद्याचे) शिवम पानपाटील (नाटक- शहिद).

दि. ६ जानेवारी ते १७ जानेवारी, २०२५ या कालावधीत छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह, जळगाव व छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, नंदुरबार येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण ३७ नाट्य प्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून गौरी लोंढे, राजीव वेंगुर्लेकर आणि शेखर भागवत यांनी काम पाहिले.
सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले असून, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ आलेल्या बालनाटकांच्या संघाचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.

ताज्या बातम्या