Thursday, May 7, 2026
Homeखानदेशस्वच्छता ही सामूहिक जबाबदारी - पालकमंत्री गुलाबराव पाटील

स्वच्छता ही सामूहिक जबाबदारी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

स्वच्छता ही सामूहिक जबाबदारी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

कंपोस्ट खड्डा भरा, गाव स्वच्छ ठेवा’ मोहिमेचा शिरसोलीत शुभारंभ

जळगाव, : “स्वच्छता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे आणि ती प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. कंपोस्ट खड्डा केवळ कचरा व्यवस्थापनाचे साधन नाही, तर गावाच्या समृद्ध भविष्यासाठीचा संकल्प आहे,” असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ अंतर्गत “एक खड्डा… एक संकल्प – स्वच्छ गाव, समृद्ध गाव!” या घोषवाक्यासह ‘कंपोस्ट खड्डा भरा, आपलं गाव स्वच्छ ठेवा’ या जिल्हास्तरीय मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते शिरसोली येथे नाडेफ खड्डा आणि कचरा विलगीकरण केंद्राचे लोकार्पण करून झाला.

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून शिरसोली प्र.न. मराठी शाळेत आयोजित या कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी सांगितले की, “घरटी शौचालय बांधणीचा पहिला टप्पा यशस्वी झाला. आता ओला-सुका कचरा विलगीकरण, त्याचा शिस्तबद्ध वापर आणि कंपोस्ट खड्ड्याद्वारे खत निर्मितीवर भर देण्याची वेळ आहे. यातून तयार होणारे खत शेतीसाठी वरदान ठरेल.” त्यांनी ग्रामस्थांना स्वच्छतेसाठी शासनासोबत सहकार्य करण्याचे आवाहन केले.पालकमंत्र्यांनी महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या स्वच्छता जनजागृतीतील योगदानाचा गौरव केला. “त्यांच्या प्रयत्नांमुळे स्वच्छता हे जनआंदोलन बनले आहे. स्वयंसेवी संस्थांचेही या मोहिमेत मोलाचे योगदान आहे,” असे ते म्हणाले.कंपोस्ट खड्डा: पर्यावरणपूरक आणि फायदेशीर – मीनल करनवाल
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, “कंपोस्ट खड्ड्याद्वारे उत्तम दर्जाचे जैविक खत तयार होते, जे पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. स्वच्छतेची शपथ कागदावर न राहता कृतीत उतरली पाहिजे.” यावेळी उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेतली.कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संचालक डॉ. सचिन पानझडे यांनी केले, तर सूत्रसंचालन क्षमता बांधणी तज्ञ मनोहर सोनवणे आणि आभार गटविकास अधिकारी सतीश धस यांनी मानले. कार्यक्रमास जिल्हाप्रमुख व माजी महापौर विष्णू भंगाळे, माजी सभापती नंदूआबा पाटील, सरपंच हिलाल भील, उपसरपंच द्वारकाबाई बोबडे, माजी सरपंच अनिल पाटील, दुध संघाचे संचालक रमेशअप्पा पाटील, ग्रामपंचायत सदस्य गौतम खरे, मुदस्सर पिंजारी, श्याम कोगटा, युवासेनेचे रोहित कोगटा, विस्तार अधिकारी राजेश इंगळे, ग्रामसेवक चिंचोरे, संवादतज्ञ निलेश रायपूरकर, समाजशास्त्रज्ञ भीमराव सूरदास, समूह समन्वयक शिरीष तायडे यांच्यासह शिक्षक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या