Saturday, October 4, 2025
Homeजळगाव जिल्हाशिक्षक दिन संपूर्ण जगात फक्त भारतात साजरा केला जातो - कुलगुरू डॉ....

शिक्षक दिन संपूर्ण जगात फक्त भारतात साजरा केला जातो – कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी

शिक्षक दिन संपूर्ण जगात फक्त भारतात साजरा केला जातो – कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी

शिक्षक दिन: रोटरी मिडटाऊनतर्फे ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ प्रदान

जळगाव: शिक्षकांनी केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रोटरी मिडटाऊनने शिक्षक दिनानिमित्त ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले.

डॉ. माहेश्वरी म्हणाले, “शिक्षक दिन हा संपूर्ण जगात फक्त भारतातच साजरा केला जातो.” त्यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना म्हटले की, शिक्षकांचे काम केवळ शिकवणे नसून, विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देणे हे आहे. चांगले शिक्षण व आरोग्य सेवा देणे हे शासनाचे कर्तव्य आहे, पण त्यात अपयश आल्यास ती सर्वांची जबाबदारी बनते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी रोटरी मिडटाऊनचे सहप्रांतपाल संजय गांधी, अध्यक्ष ॲड. किशोर बी. पाटील, मानद सचिव डी.ओ. चौधरी आणि प्रोजेक्ट चेअरमन डॉ. सुमन लोढा यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात श्रीराम आणि सरस्वती देवीच्या पूजनाने झाली.

रोटरी जळगाव परिवारातील १२ शिक्षकांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ देऊन गौरवण्यात आले. यामध्ये डॉ. प्रशांत वारके, डॉ. माया आर्वीकर, प्रा. डॉ. रश्मी शर्मा, डॉ. अपर्णा मकासरे, डॉ. काजल फिरके, छाया पाटील, काजल सुखवानी, तृप्ती बाकरे, प्रीत रावलानी, रोशनी अग्रवाल, पिंकी मंधान आणि सुरबाला चौधरी यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम सारस्वत आणि प्रा. यशवंत सैंदाणे यांनी केले, तर आभार डॉ. सुमन लोढा यांनी मानले. या कार्यक्रमातून शिक्षकांचे समर्पण आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ करण्याची त्यांची भूमिका अधोरेखित झाली.

ताज्या बातम्या