Thursday, May 7, 2026
Homeक्राईमरेल्वे स्थानकावरून व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या

रेल्वे स्थानकावरून व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या

रेल्वे स्थानकावरून व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या

जळगाव शहर पोलिसांची कारवाई

जळगाव प्रतिनिधी

कर्नाटक एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्टेशनवर आलेल्या एका उत्तर प्रदेश मधील व्यापाऱ्याला तो पान खात असताना तीन जणांनी येऊन मारहाण करून त्याला दुचाकीवर बसवून गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज येथे नेत मारहाण करून त्याच्या खिशातील 300 रुपये आणि ऑनलाईन पद्धतीने दोन हजार रुपये उकळणाऱ्या तीन जणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

उत्तर प्रदेश येथील मूळ रहिवासी असलेल्या आणि धुळे येथील व्यापारी शाहिद मुन्ना कुरेशी वय 34 हे कर्नाटक एक्सप्रेसने जळगावला रेल्वे स्टेशन जवळ उतरले असता पान टपरीवर पान घेण्यासाठी थांबले होते. या ठिकाणी तीन जणांनी अचानक येऊन शाहिद कुरेशी यांना मारहाण करून दुचाकी वर बळजबरीने भुसावळ रोडवरील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज येथे नेऊन तेथे वीस हजार रुपयांची मागणी केली.

व्यापारी असलेले शाहिद कुरेशी यांनी ऑनलाईन पद्धतीने दोन हजार रुपये आणि त्यांच्या खिशातील तीनशे रुपये त्या तिघांना काढून दिले. तिघांनी शाहिद कुरेशी यांना दमदाटी करून सोडून दिले. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्यासह डीबी पथकाने वेगात चक्रे फिरवून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारावरून संशयित यश रवींद्र पाटील वय 21 रा आव्हाने ,मनोज आधार सोनवणे वय 23 रा कांचन नगर, आणि महेंद्र पांडुरंग पाटील वय 28 रा वाटिका श्रम जळगाव या तिघांना रात्री दहा वाजेच्या सुमारास अटक केली. त्यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र शिखरे करीत आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या