Sunday, October 5, 2025
Homeक्राईममुजोरी : प्रजासत्ताकदिनी अवैध वाळूची वाहतूक ? ; तहसीलदारांचा दणका !

मुजोरी : प्रजासत्ताकदिनी अवैध वाळूची वाहतूक ? ; तहसीलदारांचा दणका !

मुजोरी : प्रजासत्ताकदिनी अवैध वाळूची वाहतूक ? ; तहसीलदारांचा दणका !

वाळूची वाहतूक करणारा डंपर पकडला ; भडगाव महसूल आणि पोलीस विभागाची कारवाई

भडगाव प्रतिनिधी

प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी सर्वच अधिकारी आणि कर्मचारी ध्वजारोहण करण्यामध्ये व्यस्त राहतील अशा अविर्भावात असणाऱ्या वाळू माफियांना भडगावच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार यांनी दणका दिला असून अवैधरित्या वाळू वाहून नेणारे डंपर भडगावच्या महसूल विभागाने पकडून  पोलिसांनी कारवाई केल्याची घटना आज २६ जानेवारी रोजी तालुक्यातील वाक येथे आज सकाळी घडली .

भडगाव तालुक्यातील वाक येथील गिरणा नदी पात्रातून दिवस रात्र बेसुमार अवैध वाळू वाहतूक चालू आहे. यावर आज सकाळी भडगाव महसूल विभागाच्या पथकाने कारवाई करून वाळूचे डंपर जप्त करण्यात आले .

हि कारवाई तहसिलदार शितल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील ग्राम महसूल अधिकारी पाशा हलकारे, विजय पाटील, विलास शिंदे, सुनील मांडोले,समाधान हुल्लुळे, लोकेश महाजन, विशाल सुर्यवंशी आदींनी कारवाई केली. या वेळी वाळू माफियाने हुज्जत घातली असता भडगाव पोलीसांना घटनास्थळी बोलावून डंपर ताब्यात घेतले. यावेळी पो. हे काँ. संजय पाटील, दत्ता पाटील, चालक संभाजी पाटील आदीं पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या