Sunday, August 3, 2025
Homeक्राईममहाविद्यालयातील “पिंक हॅट्स क्लब”चा उपक्रम ; वक्तृत्व स्पर्धेतून विद्यार्थिनीनी दिले आरोग्य व...

महाविद्यालयातील “पिंक हॅट्स क्लब”चा उपक्रम ; वक्तृत्व स्पर्धेतून विद्यार्थिनीनी दिले आरोग्य व सबलीकरणाचे धडे

महाविद्यालयातील “पिंक हॅट्स क्लब”चा उपक्रम ; वक्तृत्व स्पर्धेतून विद्यार्थिनीनी दिले आरोग्य व सबलीकरणाचे धडे

जळगाव- येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात विध्यार्थिनीसाठी सतत कार्यशील असलेल्या “पिंक हॅट्स क्लब” च्या वतीने राष्ट्रीय बालिका दिन ता.२४ शुक्रवार रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटील उपस्थित होते. या उपक्रमाचे प्रास्ताविक करतांना जी. एच. रायसोनी महाविध्यालयाचे अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी नमूद केले कि, आज देशात राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जात आहे. राष्ट्रीय बालिका दिन हा एक विशेष दिवस आहे, जो मुलींना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि त्यांना विकासाच्या समान संधींसह समाजात सन्मान मिळावा या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. भारतात लैंगिक भेदभाव ही काही नवीन गोष्ट नाही, शतकानुशतके ही प्रथा चालत आली आहे. परंतु आता मुलींना मुलांप्रमाणेच सर्व हक्क मिळत असून प्रत्येक क्षेत्रात त्या आघाडीवर असल्याचे सांगत त्यांनी मुलींच्या शिक्षा, स्वास्थ्य आणि रोजगार या संदर्भात मार्गदर्शन केले.

ताज्या बातम्या