Thursday, May 7, 2026
Homeखानदेशभागपूर उपसा सिंचन योजनेला वेग ; नामदार गिरीश महाजन यांचा आढावा, शेतकऱ्यांना...

भागपूर उपसा सिंचन योजनेला वेग ; नामदार गिरीश महाजन यांचा आढावा, शेतकऱ्यांना मिळणार भरघोस फायदा

भागपूर उपसा सिंचन योजनेला वेग ; नामदार गिरीश महाजन यांचा आढावा, शेतकऱ्यांना मिळणार भरघोस फायदा

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील महत्वाकांक्षी भागपूर उपसा सिंचन योजनेचे काम वेगाने प्रगतीत असून या योजनेमुळे जळगाव, जामनेर व पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रकल्पाचा आढावा आज राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री तथा आमदार गिरीश भाऊ महाजन यांनी घेतला.

या प्रसंगी अभियंता श्री. व्हि. डि. पाटील, अधीक्षक अभियंता श्री. गो. श्रा. महाजन, कार्यकारी अभियंता श्री. प्र. पा. वराडे, उपअभियंता श्री. च. सु. खंबायत, सहायक अभियंता श्री. रा. भ. पाटील उपस्थित होते.

प्रकल्पाचा खर्च व सिंचन क्षेत्र

या योजनेची एकूण अंदाजित किंमत रु. ३५३३.०५ कोटी इतकी असून, सदर योजनेतून ५ मध्यम व ४४ लघु प्रकल्पांचे स्थिरीकरण करण्यात येत आहे. प्रकल्पाचा एकूण पाणीसाठा १९२.६५६ दलघमी असून ३०,७६४ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

टप्पा – १

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील लाभक्षेत्र १३,९०४ हेक्टर आहे. जळगाव तालुक्यातील पुढील २६ गावांना सिंचनाचा थेट फायदा होणार आहे.
ही गावे अशी : चिंचोली, कंडारी, उमाळे, पाथरी, धानवड, शिरसोली प्र. बो., दापोरे, जावखेडे, शिरसोली प्र. नो., देव्हारी, कुऱ्हदडे, वराड खु., वाकडी, वावदडे, रामदेववाडी, लोणवाडी खु., वसंतवाडी, विटनेर, जळके, लोणवाडी बृ., बिलखेड, बिलवाडी, डोमगाव, सुभाषवाडी, वदली, वराड बृ.

टप्पा – २

प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रस्तावित पाणीसाठा ९८.३५ दलघमी असून लाभक्षेत्र १६,८६० हेक्टर आहे.जामनेर तालुक्यातील २२ लघु व २ मध्यम प्रकल्प,पाचोरा तालुक्यातील २० लघु व ३ मध्यम प्रकल्प,तर जळगाव तालुक्यातील २ लघु प्रकल्पांची तूट भरून काढली जाणार आहे.याशिवाय कांग प्रकल्पाची उंची वाढ, गोलटेकडी ल.पा. प्रकल्प व एकुलती सा.त. प्रकल्पांचाही समावेश आहे.

शेतकऱ्यांना दिलासा

या योजनेमुळे जळगाव, जामनेर व पाचोरा तालुक्यातील शेतकरी थेट लाभार्थी ठरणार असून, सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे व कृषी उत्पादनात मोठी भर पडणार आहे.

गिरीश महाजन यांचा विश्वास

भागपूर उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाल्यानंतर जिल्ह्यातील शेतीचे भविष्य उज्ज्वल होईल, असा विश्वास राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी व्यक्त केला.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या