भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशनच्या गणपती मंडळात तृतीयपंथींच्या हस्ते झाली बाप्पाची स्थापना
जळगाव– भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मागील 17 वर्षांपासून काव्यरत्नावली चौक, जळगाव येथे सार्वजनिक आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.
यावर्षी गणपती गणपती मंडळात तृतीयपंथींच्या हस्ते बाप्पाची स्थापना करण्यात आली. या वेळी तृतीयपंथी रेणुका मावळी, पिंकी चौधरी उर्फ पिंकी जान, पुजारी प्रमोद शुक्ला तसेच रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, उमेश पाटील, राहुल पाटील, युवाशक्ती फाउंडेशनचे विराज कावडीया, रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, उमेश पाटील, राहुल पाटील, जैन इरिगशनचे जनसंपर्क अधिकारी हरिष शिरसाळे, प्रीतम शिंदे, संदीप सूर्यवंशी, पियुष हसवाल, उज्वला वर्मा, सुनील वर्मा, ऑफेझ पटेल, सागर सोनवणे, दीक्षांत जाधव, शिवम महाजन, राहुल चव्हाण, रामप्रसाद वाणी, हर्षल तेली, मनोज चव्हाण, आदि उपस्थित होते.