बसमध्ये चढणाऱ्या वृद्धाची वीस हजार रुपयांची रोकड लांबवली
जळगाव प्रतिनिधी
शहरातील नवीन बस स्थानक येथे भुसावळ नाशिक या बस मध्ये चढत असताना एका सेवानिवृत्त झालेल्या वृद्धाच्या खिशामधून 20 हजार रुपयांची रोकड लांबवल्याची घटना 31 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की कांचन नगर शनिपेठ परिसरात राहणारे सेवानिवरृत्त कर्मचारी अनिल हजारी घेंगट( वय 64) हे जळगाव येथील नवीन बस स्टॅन्ड मध्ये भुसावळ ते नाशिक या बस मध्ये 31 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशामधून वीस हजार रुपयांची रोकड लांबविली, याप्रकरणी अनिल घेंगट यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र ठाकरे करीत आहे.