Thursday, May 7, 2026
Homeजळगाव जिल्हाधरणगाव येथील आरोग्य सेवक मिलिंद लोणारी यांना "गुणवंत कर्मचारी पुरस्कार

धरणगाव येथील आरोग्य सेवक मिलिंद लोणारी यांना “गुणवंत कर्मचारी पुरस्कार

धरणगाव येथील आरोग्य सेवक मिलिंद लोणारी यांना “गुणवंत कर्मचारी पुरस्कार

उल्लेखनीय कामगिरीसाठी अनेक पुरस्कार प्राप्त

धरणगाव | प्रतिनिधी – ग्रामविकास विभागाच्या वतीने सन २०२२-२३ या वर्षासाठी जाहीर करण्यात आलेल्या गुणवंत अधिकारी/कर्मचारी पुरस्कारात पंचायत समिती, धरणगाव येथील आरोग्य सेवक मिलिंद मनोहर लोणारी यांची निवड करण्यात आली आहे. स्थानिक तसेच जिल्हास्तरावर त्यांचे अभिनन्दन आणि कौतुक होत आहे .

ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या शासन निर्णयानुसार (दि. २ सप्टेंबर २००५) सन २००५-०६ पासून गुणवंत अधिकारी/कर्मचारी यांचा गौरव करण्याची योजना राबवली जात आहे. या अंतर्गत मंत्रालय तसेच क्षेत्रीय कार्यालयांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या तांत्रिक व प्रशासकीय कौशल्याचा सन्मान केला जातो.

श्री. लोणारी यांनी याआधीही उल्लेखनीय कामगिरीसाठी अनेक पुरस्कार मिळवले आहेत. २३ जानेवारी २०२३ रोजी मुंबईतील रंगशारदा सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्यांना “वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार” देण्यात आला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री ना. दीपक सावंत यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व एक लाख रुपये रोख रक्कम देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता.

कोविड काळातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याचीही दखल घेण्यात आली होती. जिल्हा परिषद, जळगावच्या आरोग्य विभागात कार्यरत असताना त्यांनी जिल्हा प्रसिद्धी व माध्यम अधिकारी पदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडत विविध आरोग्य योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले. तसेच साथीच्या रोगांविरुद्ध लढताना त्यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांना राज्य आरोग्य व शिक्षण व संपर्क विभाग, पुणे यांच्या वतीने राज्यस्तरीय प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले होते.

ही श्री. लोणारी यांची तिसरी वेळ असून, राज्य शासनाच्या गुणवंत कर्मचारी पुरस्कारासाठी पुन्हा एकदा निवड झाल्याने त्यांच्या कार्याचा गौरवच नव्हे, तर आरोग्य सेवक या भूमिकेतील कार्यक्षमतेचंही एक सकारात्मक उदाहरण समोर आलं आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या