दुचाकीला लावलेल्या पिशवी मधून 40 हजारांची रोकड लांबवली
धरणगाव शहरातील घटना
धरणगाव प्रतिनिधी
शहरातील बेलदार कॉम्प्लेक्स माऊली मेन्स पार्लर या ठिकाणी दुचाकी ला लावलेल्या पिशवी मधून अज्ञात चोरट्याने 40 हजार रुपये लंपास केल्याची घटना 30 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथील शेतकरी असलेले सचिन रामलाल पाटील वय 33 हे कामानिमित्त धरणगाव शहरातील बेलदार कॉम्प्लेक्स येथील माऊली मेन्स पार्लर येथे 30 जानेवारी रोजी आले असता त्यांनी मोटरसायकल ला एका पिशवीत चाळीस हजार रुपयांची रोकड ठेवली होती. ही रोकड अज्ञात चोरट्याने दुपारी दोन वाजेच्या सुमारास चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सचिन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस स्टेशनलाअज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक करीम सय्यद करीत आहे.