Thursday, May 7, 2026
Homeक्राईमतुलसी एक्सप्रेसच्या धडकेत तरुण ठार, दुसरा गंभीर जखमी

तुलसी एक्सप्रेसच्या धडकेत तरुण ठार, दुसरा गंभीर जखमी

जळगाव (प्रतिनिधी) :-नंदुरबार वरून जळगाव येथे रेल्वेने आलेल्या दोन मित्रांना तुलसी एक्सप्रेसने दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.

या प्रकरणी पोलिसात आकस्मात मूर्तीची नोंद करण्यात आली आहे. ओम विजय वाघेला वय 23 रा. अहमदाबाद असे मृत तरुणाचे नाव असून समर्थ रघुवंशी वय 22 रा. नंदुरबार असे गंभीर झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बडोदा येथे महाविद्यालयीन शिक्षण घेणारे ओम आणि समर्थ हे दोन्ही मित्र जळगावहून काही मित्रांसोबत नाशिकला जाणार होते. हे दोघी नंदुरबार होऊन जळगाव कडे येत असताना त्यांची रेल्वे आऊटर ला काही वेळ थांबली असता बराच वेळ झाला असे समजा दोघांनी पायी चालत जाऊन रेल्वे स्टेशन गाठण्याचा निर्णय घेतला. मात्र जळगाव कडून येणाऱ्या तुलसी एक्सप्रेसने दोघांना धडक दिल्याने यात ओम वाघेला हा दूर फेकला जाऊन तो जागीच ठार झाला तर त्याचा मित्र समर्थ रघुवंशी हा गंभीर जखमी झाला. याबाबत पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे,

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या