Tuesday, April 21, 2026
HomeBlogजळगाव जिल्हा पोलिस दलातर्फे आगामी सण-उत्सवांसाठी शांतता समितीची बैठक

जळगाव जिल्हा पोलिस दलातर्फे आगामी सण-उत्सवांसाठी शांतता समितीची बैठक

जळगाव जिल्हा पोलिस दलातर्फे आगामी सण-उत्सवांसाठी शांतता समितीची बैठक

शांतता आणि सौहार्द टिकवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी आगामी सण-उत्सव शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडावेत, यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शांतता समितीची बैठक सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात पार पडली. या बैठकीत पोलीस आणि प्रशासन अधिकाऱ्यांसह प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थिती लावली.

बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे, जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्यासह विविध पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

शांतता राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी

समाजातील प्रतिष्ठित आणि जबाबदार नागरिकांनी शांतता राखण्याची जबाबदारी स्वीकारावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी केले. तसेच, महापुरुषांच्या स्मारकांचा योग्य सन्मान व्हावा आणि समाजात अज्ञानता दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

सोशल मीडियाचा गैरवापर टाळावा – पोलीस अधीक्षकांचा इशारा

सध्या सोशल मीडिया हे गैरसमज आणि वाद निर्माण करण्याचे प्रमुख साधन बनले आहे. विशेषतः १५ ते २५ वयोगटातील युवक सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर करत असल्याने वाद निर्माण होतात. त्यामुळे अशा प्रकारची कोणतीही आक्षेपार्ह माहिती पोलिसांपर्यंत तत्काळ पोहोचवावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले.
नागरिकांकडून महत्त्वपूर्ण सूचना

शांतता समितीच्या बैठकीत उपस्थित नागरिकांनी काही महत्त्वाच्या सूचना मांडल्या:
आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट त्वरित पोलिसांना कळवाव्यात.
शहरात अधिकाधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
११ एप्रिल रोजी महात्मा फुले मार्केट आणि १४ एप्रिलच्या आधी मुख्य मिरवणूक मार्ग अतिक्रमणमुक्त करावा.

शांतता समिती सदस्यांना हेल्मेट वाटप

बैठकीच्या शेवटी, जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शांतता समिती सदस्यांना हेल्मेट वाटप करण्यात आले. वाहतुकीचे नियम पाळणे आणि अपघात टाळणे अत्यंत आवश्यक असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी केले, तर अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी आभार मानले.

सण-उत्सव शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या