Saturday, October 4, 2025
Homeखानदेशआंतर शालेय कान्ह चषक गायन स्पर्धेत ब.गो.शानभाग तसेच महात्मा गांधी विद्यालय वरणगाव...

आंतर शालेय कान्ह चषक गायन स्पर्धेत ब.गो.शानभाग तसेच महात्मा गांधी विद्यालय वरणगाव विजेते तर नृत्य स्पर्धेत एटी झांबरे ,ओरियन इंग्लिश मीडियम स्कूलचे वर्चस्व

आंतर शालेय कान्ह चषक गायन स्पर्धेत ब.गो.शानभाग तसेच महात्मा गांधी विद्यालय वरणगाव विजेते तर नृत्य स्पर्धेत एटी झांबरे ,ओरियन इंग्लिश मीडियम स्कूलचे वर्चस्व

जळगाव- केसीई सोसायटी संचलित कान्ह ललित कला केंद्राद्वारे आंतर शालेय एकल गीत गायन व नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, यंदाचे हे तिसऱ्या वर्षाचे आयोजन करण्यात आले होते. बालगट व कुमार गटातून गायन स्पर्धेसाठी 37 विद्यार्थी तर नृत्य स्पर्धेत 36 विद्यार्थ्यांनी विविध शाळांच्या माध्यमातून आपला सहभाग नोंदवला होता. मु. जे. महाविद्यालयाच्या परिसरात दोन स्वतंत्र रंगमंचावर या स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. केसीई सोसायटीचे सहसचिव प्रवीणचंद्र जंगले, व्यवस्थापन मंडळ सदस्य डॉ.शिल्पा बेंडाळे, प्राचार्य अशोक राणे, तसेच कान्ह ललित कला केंद्राचे संचालक शशिकांत वडोदकर यांच्या शुभहस्ते विजेत्या शाळांच्या विद्यार्थ्यांना चषक, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. नृत्य स्पर्धाप्रमुख अजय शिंदे, गायन स्पर्धाप्रमुख देवेंद्र गुरव, यांनी स्पर्धा पारदर्शक भावी यासाठी विशेष आयोजन केले होते.
या कार्यक्रमासाठी मयुरी हरीमकर, प्रसाद कासार, अनुष्का परिहार, मंगेश वाघ यांचे सहकार्य लाभले. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. ऐश्वर्या परदेशी, प्रिया बोरसे, दुष्यंत जोशी, हिमानी महाजन यांनी केले. या कार्यक्रमाचे संयोजन, तसेच आभार प्रदर्शन कान्ह ललित कला केंद्राचे समन्वय प्रा. प्रसाद देसाई यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी बडगुजर यांनी केले.

गीत गायन स्पर्धेचा निकाल:- ( बाल गट)
प्रथम- विभावरी परदेशी, ब. गो. शानभाग विद्यालय जळगाव
द्वितीय- आकांक्षा शर्मा ओरियन सीबीएससी स्कूल जळगाव.
तृतीय- ( विभागून ) देवांशी चौधरी व भार्गवी पाटील ब. गो.शानभाग विद्यालय
उत्तेजनार्थ प्रथम- शिवानी देशपांडे ओ एन सी बी एस सी स्कूल जळगाव.
उत्तेजनार्थ द्वितीय – दुर्वा देसाई, डॉ. अविनाश आचार्य विद्यालय जळगाव.

गीत गायन स्पर्धा स्पर्धेचा निकाल (मोठा गट) –
प्रथम मानस पाटील महात्मा गांधी विद्यालय वरणगाव.
द्वितीय विभागून – ईशान भालेराव एटी झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव व भावेश पाटील भगो शानभाग विद्यालय जळगाव.
तृतीय विभागून = काव्या पवार ब. गो. शानबाग विद्यालय.व काव्य पवार विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल.
उत्तेजनार्थ प्रथम – रिद्धी मुळे बघू शानभाग विद्यालय जळगाव.
उत्तेजनार्थ द्वितीय पूजा भट ओरियन स्कूल जळगाव.

नृत्य स्पर्धा स्पर्धेचा निकाल (बालगट) –
प्रथम – प्रांजल सपकाळे ए. टी.झांबरे विद्यालय जळगाव
द्वितीय – काव्या फेगडे – ए टी झांबरे विद्यालय जळगाव
तृतीय- शब्दजा खंबायत – ओरियन इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव
उत्तेजनार्थ प्रथम- हर्षिका इंगळे ओरियन इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव
उत्तेजनार्थ द्वितीय – मोक्षदा पाचपांडे ओरियन इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव.

नृत्य स्पर्धा स्पर्धेचा निकाल (कुमार गट –
प्रथम- समीक्षा येवले ओरियन इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव
द्वितीय- केतकी कोरे प.न. लूंकड कन्या शाळा जळगाव
तृतीय- पूर्वा कुकरेजा – ओरियन स्टेट बोर्ड जळगाव

 

ताज्या बातम्या