Saturday, June 14, 2025
Homeखानदेशसंत मुक्ताई यात्रेदरम्यान तरुणींची टवाळखोरांनी काढली छेड

संत मुक्ताई यात्रेदरम्यान तरुणींची टवाळखोरांनी काढली छेड

संत मुक्ताई यात्रेदरम्यान तरुणींची टवाळखोरांनी काढली छेड

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे संतप्त ; मुक्ताई नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी

कोथळी येथे संत मुक्ताई यांच्या यात्रेदरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तरुणींची काही टवाळखोरांनी छेड काढल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला  यानंतर रक्षा खडसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसह मोठ्या जमावसह पोलीस स्टेशनला दाखल झाले. मी केंद्रीय मंत्री आणि खासदार म्हणून नाही तर आई म्हणून न्याय मागण्यासाठी पोलीस स्टेशनला आली आहे. माझीच मुलगी सुरक्षित नाही तर इतरांचं काय? राज्य सरकारने याबद्दल कठोरात कठोर कारवाई करावी. तसेच याबद्दल कायद्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात मागणी करणार आहे, असेही रक्षा खडसे म्हणाल्या. मुक्ताई नगर पोलीस ठाण्यात मंत्री रक्षा खडसे यांच्या सुरक्षा रक्षकाने चार तरुणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

 

संबंधित तरुणांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे रक्षा खडसे संतप्त झाल्या असून, त्यांनी थेट मुक्ताईनगर पोलिस ठाणे गाठून अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

संत मुक्ताई यात्रेत मोठ्या संख्येने भक्तगण व नागरिक सहभागी होतात. यात्रेच्या निमित्ताने महिलांवर अशा प्रकारच्या अनुचित घटना घडणे हे अत्यंत चिंताजनक असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले. या प्रकारानंतर मंत्री रक्षा खडसे यांनी पोलिस प्रशासनाला चांगलेच सुनावले. “मुलींच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली पाहिजेत. छेडछाड करणाऱ्यांना तत्काळ अटक झाली पाहिजे,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

यावेळी माध्यमांशी बोलतांना रक्षा खडसे म्हणाल्या कि कोथळी येथे दरवर्षाप्रमाणे यात्रा भरते माझी मुलगी हि शुक्रवारी यात्रेत गेली असता तिची काही टवाळखोर तरुणांनी छेड काढल्याचा प्रकार घडला असून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आपण काही मुलींसोबत सोबत आल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलतांना सागितले .

ताज्या बातम्या