Thursday, April 16, 2026
Homeक्राईमदुर्दैव :वळण घेणारा डंपर पलटी झाल्याने दोन विद्यार्थिनींचा चिरडून मृत्यू

दुर्दैव :वळण घेणारा डंपर पलटी झाल्याने दोन विद्यार्थिनींचा चिरडून मृत्यू

दुर्दैव :वळण घेणारा डंपर पलटी झाल्याने दोन विद्यार्थिनींचा चिरडून मृत्यू

पुण्यातील हिंजवडी येथील घटना

पुणे वृत्तसंस्था

पुण्यातील हिंजवडी मान रस्त्यावरील वडजाई नगर कॉर्नर जवळ 32 टन सिमेंट घेऊन जाणारा रेडी मिक्स डंपर वळण घेत असताना अचानक पलटी झाल्यामुळे दोन विद्यार्थिनी डंपर खाली सापडून चिरडल्या गेल्याची दुर्दैवी घटना 24 रोजी सायंकाळी घडली असून या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

प्रांजली महेश यादव (वय – 22, रा. गोदरेज प्रॉपर्टीज्, म्हाळुंगे; मूळ रा. टेंभुर्णी, ता. माढा) आणि आश्लेषा नरेंद्र गावंडे (वय – 22, रा. गोदरेज प्रॉपर्टीज्, म्हाळुंगे; मूळ रा. शेगाव, अमरावती) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोन विद्यार्थिनींची नावे आहेत.

या दोघी एमआयटी कॉलेजध्ये अभियांत्रिकेच्या शेवटच्या वर्षात शिकत होत्या. काल (शुक्रवारी) सायंकाळी त्या दुचाकीवरून चालल्या होत्या. वडजाईनगर कॉर्नरजवळ भरधाव आलेल्या डंपरचालकाचे वळणावर नियंत्रण सुटल्यानं डंपर पलटी झाला. प्रांजली आणि आश्लेषा या डंपरखाली सापडल्या गेल्या. तीन क्रेनच्या मदतीने डंपर बाजूला घेण्यात आला.

पलटी झालेल्या या डंपरमध्ये तब्बल 32 टन सिमेंट होतं. चालकाचं वळणावरतीच डंपरवरील नियंत्रण सुटल्याने डंपर पलटी झाला आणि 32 टनच्या या वजनाखाली दबल्या जाऊन या दोन्ही तरुणींचा चेंदामेंदा झाला. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे फावड्याने गोळा करताना अग्निशमन दलाच्या जवानांनाही गहिवरून येत होते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे,

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या