Saturday, April 18, 2026
Homeक्राईमजळगावात घरफोडी, ३.५ लाखांचे दागिने लंपास

जळगावात घरफोडी, ३.५ लाखांचे दागिने लंपास

जळगाव: जळगावातील एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या अयोध्या नगरमध्ये एका बंद घरातून चोरट्यांनी तब्बल ३ लाख ५० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरले आहेत. ही घटना स्वामी दर्शन अपार्टमेंटमध्ये घडली.

आरती कृष्णा शिंपी (वय ४९) या आपल्या कुटुंबासह २७ ऑगस्ट रोजी मुंबई आणि सुरतला गेल्या होत्या. ५ सप्टेंबर रोजी त्या घरी परत आल्यावर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटातून त्यांनी ३ लाख ५० हजार ७५० रुपयांचे दागिने चोरले. यामध्ये आरती शिंपी यांच्या मैत्रिणीचे दागिनेही होते.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके पुढील तपास करत आहेत.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या