जळगावः शहरातील एकलव्य क्रीडा संकुल (एम. जे. कॉलेज) येथे दि. २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान आयोजित अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन आज शुक्रवारी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते झाले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, निर्मल सीडसचे डॉ. जे. सी. राजपूत, नमो बायो प्लांटचे पार्श्व साभद्रा, ओम गायत्री नर्सरीचे राजेंद्र गवळी, आत्माचे माजी उपप्रकल्प संचालक अनिल भोकरे, राईस एन शाईनचे अमेय पाटील, अॅग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण यावेळी उपस्थित होते. प्रदर्शनात कृषी यंत्रांचे ४० तर एकूण २०० हून अधिक स्टॉल्स असून हे प्रदर्शन २ डिसेंबर (सोमवार) पर्यंत सुरु राहणार आहे.
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी शेतर्कयांचा विक्रमी प्रतिसाद लाभला. पहिल्याच दिवशी हजारो शेतर्कयांनी
प्रदर्शनाला भेट देवून नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली. प्रदर्शनात निर्मल सीड्सच्यावतीने पहिल्या पाच हजार शेतर्कयांना विविध प्रकारच्या भाजीपाला सॅम्पल बियाणे पाकिटाचे मोफत वितरण करण्यात आले. गोदावरी फाउंडेशनतर्फे प्रदर्शनात आलेल्या पुरुष व महिला शेतकऱ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी मोफत करण्यात येत आहे. प्रदर्शन २ डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.
आज पुरस्कार वितरण
प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात दि.३० शनिवार रोजी दुपारी १२ वाजता कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे शेतकरी, गट, उद्योजक यांचा पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार आहे. आ. सुरेश भोळे, आ. अमोल जावळे, आ. अमोल पाटील, श्रीराम उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीराम पाटील यांच्या हस्ते