Sunday, September 20, 2026
Homeखानदेशराज्यात पावसासह गारपिटीचा इशारा

राज्यात पावसासह गारपिटीचा इशारा

पुणे वृत्तसंस्था :- मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांत गारपिटीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, सध्या राज्याच्या काही भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र सक्रिय आहे. उत्तर तामिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे हे दाब क्षेत्र येत आहे. यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अडथळा येत आहे. त्यामुळे राज्यामध्ये थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच पावसासाठी वातावरण तयार होऊ लागले आहे. राज्याच्या काही भागात पुढील २४ व २५ डिसेंबरदरम्यान ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तर २६ ते २९ डिसेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात यलो अलर्ट आहे.

या’ भागात विजांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

सांगली, सातारा, कोल्हापूर, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, नाशिक, सोलापूर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, नदिड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नंदूरबार, धुळे, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम, हिंगोली या भागात विजांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे, तर काही भागात गारपिटीची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोमवारी

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या