Wednesday, August 12, 2026
HomeBlogवीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

जळगाव : स्मार्ट मीटर बसवलेल्या ग्राहकांचा थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यावर वीजबिल न भरता परस्पर जोडणी घेणाऱ्या ग्राहकांविरोधात महावितरणने धडक मोहीम सुरु केली आहे. शुक्रवारी अशा  ग्राहकांवर गुन्हे दाखल केल्यानंतर सोमवारी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महावितरणने नितीन साहित्यानगर, सुप्रीम कॉलनी येथील रहिवासी संजय भगवान महाजन या ग्राहकाचा वीजपुरवठा थकबाकीसाठी स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट (आपोआप खंडित) केलेला होता. मात्र त्यानंतरही त्याने थकबाकी भरली नाही. महावितरणच्या पथकाने तपासणी केली असता या ग्राहकाने घराशेजारी असलेल्या लघुदाब वीज वाहिनीवर आकडा टाकून वीजचोरी केल्याचे आढळले. या ग्राहकाने २१२० रुपयांची वीजचोरी केली. दुसऱ्या प्रकरणात सुप्रीम कॉलनीतील येथील रहिवासी अकिब शाह अब्दुल रहमान शाह या ग्राहकाने थकबाकीसाठी स्मार्ट मीटरद्वारे वीजपुरवठा खंडित असतानाही वीज वाहिनीवर आकडा टाकून अनधिकृत वीजवापर केला. या ग्राहकाने १२३० रुपयांची वीजचोरी केली. महावितरणचे सहायक अभियंता विशाल नेमाडे यांच्या फिर्यादीवरून या २ जणांवर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात १० ऑगस्ट रोजी भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

        दरम्यान, थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांनी आपली वीजबिले तातडीने भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केला आहे. थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित‍ केलेल्या ग्राहकांची पडताळणी करण्यासाठी महावितरणने पथके स्थापन केली आहेत. वीजपुरवठा परस्पर जोडल्याचे या पथकांना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. तसेच अनधिकृतपणे वीजपुरवठा जोडल्यास प्राणांतिक अपघाताचाही धोका आहे. त्यामुळे वीजपुरवठा अनधिकृतरीत्या जोडू नका. वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना शेजाऱ्यांनीही अनधिकृतरीत्या वीजपुरवठा देऊ नये. नसता त्यांचाही वीजपुरवठा खंडित करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे महावितरणने कळवले आहे.
आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या