Wednesday, August 12, 2026
HomeBlogइनरव्हील क्लब ऑफ ईस्टरतर्फे सावता माळी नगरात १०१ रोपांचे रोपण शहरात १...

इनरव्हील क्लब ऑफ ईस्टरतर्फे सावता माळी नगरात १०१ रोपांचे रोपण शहरात १ हजार वृक्षलागवडीचा संकल्प

इनरव्हील क्लब ऑफ ईस्टरतर्फे सावता माळी नगरात १०१ रोपांचे रोपण
शहरात १ हजार वृक्षलागवडीचा संकल्प

जळगाव –
पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी आणि शहरातील हिरवळ वाढवण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या वतीने सावता माळी नगर परिसरात ऑक्सिजन बँक उपक्रमांतर्गत १०१ रोपांची यशस्वी लागवड करण्यात आली. केवळ औपचारिक वृक्षारोपण न करता, या लावलेल्या सर्व रोपांचे संवर्धन आणि संगोपन करण्याची पूर्ण जबाबदारी देखील क्लबने स्वीकारली आहे.

या उपक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे उपस्थित होत्या. मान्यवरांनी इनरव्हील क्लबच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. कार्यक्रमाच्या वेळी क्लबच्या अध्यक्ष रितू शर्मा, सचिव पायल जैन, पीडीसी संगीता घोडगावकर, आयपीपी सिमरन पाटील, नगरसेविका डॉ. अमृता सोनवणे, डॉ. चंद्रशेखर पाटील उपस्थित होत्या. या उपक्रमात ग्रीन सिटी फाउंडेशनच्या सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले. प्रसंगी विजय वाणी, वसंत पाटील, डॉ. धनंजय बेंद्रे, मयूर चौधरी, आशिष हाडा, प्रवीण पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यावरण संरक्षणाची ही चळवळ अशीच पुढे सुरू ठेवत, इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्टतर्फे येत्या आठवडाभरात शहरातील विविध भागांत तब्बल १ हजार रोपांची लागवड केली जाणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या