Friday, June 13, 2025
Homeजळगाव जिल्हाघराघरात ताई मनामनात ताई, जयश्रीताई जयश्रीताई” ; नव्या उमेदीने जयश्री महाजनांकडे जनतेचं...

घराघरात ताई मनामनात ताई, जयश्रीताई जयश्रीताई” ; नव्या उमेदीने जयश्री महाजनांकडे जनतेचं लक्ष…

जळगाव प्रतिनिधी |

जळगाव शहराच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचाराची धूम सध्या शहरभर दिसून येत आहे. महाविकास आघाडीच्या वतीने जयश्री महाजन यांच्या समर्थनार्थ आज संभाजीनगर भागात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

रॅली दरम्यान, जयश्री महाजन यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “घराघरात ताई, मनामनात ताई! जयश्रीताई, जयश्रीताई!” असा उत्साही नारा देत नागरिकांनी आपले समर्थन महाजन यांना जाहीर केले. या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

जयश्री महाजन यांच्या प्रचारासाठी आलेल्या या जनसमुदायातून जळगावातील जनतेचे बदलाच्या दिशेने मोठे आशास्थान दिसून येत आहे. शहरातील विविध विकास कामांसाठी नवा चेहरा म्हणून जयश्री महाजन यांच्याकडे पाहिले जात आहे. नागरिकांमध्ये महाजन या बदल घडवून आणतील अशी अपेक्षा बळावली आहे.

“जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमी कटिबद्ध राहीन आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध आहे,” असे आत्मविश्वासपूर्ण विधान जयश्री महाजन यांनी केले.

ताज्या बातम्या