Saturday, August 2, 2025
Homeक्राईम सुनील महाजन यांना खंडपीठाकडून ७ दिवसांसाठी अटकपूर्व जामीन मंजूर

 सुनील महाजन यांना खंडपीठाकडून ७ दिवसांसाठी अटकपूर्व जामीन मंजूर

सुनील महाजन यांना खंडपीठाकडून ७ दिवसांसाठी अटकपूर्व जामीन मंजूर

जळगाव प्रतिनिधी

महानगर पालिकेचे माजी विरोधीपक्षनेते सुनील महाजन यांच्यावर ब्रिटिशकालीन पाईपलाइन चोरी प्रकरणी चोरी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र दाखल गुन्ह्यानंतर ते फरार होते. उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद ) खंडपीठाकडून सुनील महाजन यांना ७ दिवसांसाठी अटकपूर्व जामिनाला मंजुरी दिल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

जळगाव महापालिका मालकीची जुनी पाईपलाईन जेसीबीच्या सहाय्याने २ डिसेंबर २०२४ रोजी काढली जात असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर याप्रकरणी मनपाचे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता योगेश बोरोले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून संशयित आरोपी अक्षय अग्रवाल, रोहन चौधरी, भावेश पाटील, अमीन राठोड व नरेंद्र पानगडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तपासात सुनील महाजन आणि रोहन चौधरी यांची नावे वाढवली होती. या प्रकरणात सूत्रधार सुनील महाजन हे असल्याचे समोर आले होते. यानंतर आणखी २ वेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

दरम्यान सुनील महाजन यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला होता. यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. खंडपीठाचे न्यायमूर्ती पेडणेकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.

यात ॲड. सागर चित्रे व ॲड. राजेंद्र देशमुख यांनी युक्तीवाद करतांना सुनील महाजन हे विद्यालयात मुख्याध्यापक असल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांची परिक्षा असून त्यांना कार्यालयीन कामे पूर्ण करावी लागतील असे सांगितले.न्यायमूर्ती यांनी त्यांचा हा युक्तीवाद मानून सुनील महाजन यांना 4 फेब्रुवारीपर्यंत अंतरीम जामीन मंजूर केल्याने त्यांना या प्रकरणी दिलासा मिळाला आहे. सुनील महाजन यांच्या वतीने ॲड. सागर चित्रे व ॲड. राजेंद्र देशमुख यांनी काम पाहिले.

ताज्या बातम्या