आमदार राजूमामा भोळे यांनी सहपरिवार बजावला मतदानाचा हक्क
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रियेला उत्साहात प्रारंभ झाला आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी आज सकाळी सहपरिवार मतदानाचा हक्क बजावून नागरिकांना मतदानाचे आवाहन केले.

आमदार राजूमामा भोळे यांनी शहरातील प्रभाग क्रमांक ७ अंतर्गत असलेल्या रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूल येथे जाऊन आपले मत नोंदवले. यावेळी त्यांच्यासोबत माजी महापौर सीमाताई भोळे, महायुतीकडून बिनविरोध निश्चित झालेले उमेदवार विशाल भोळे तसेच कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
लोकशाहीच्या सणात प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी आमदार भोळे यांनी केले. सकाळपासूनच विविध मतदान केंद्रांवर मतदारांची रांग दिसून येत असून शहरात शांततेत व सुरळीत मतदान प्रक्रिया सुरू असल्याचे चित्र आहे.
