प्रभाग १३ मध्ये उमेदवार प्रफुल देवकर यांच्यासह महायुतीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ मध्ये महायुतीच्या उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढवत जनसंपर्कावर भर दिला आहे. गाडगे बाबा चौक व मोहन नगर परिसरात काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महायुतीचे उमेदवार प्रफुल देवकर यांच्यासह सर्व उमेदवारांनी दौलत नगर, रामनगर तसेच गाडगे बाबा चौक भागात घरोघरी भेटी देत मतदारांशी संवाद साधला.

या प्रचार दौऱ्यादरम्यान ठिकठिकाणी महिलांनी उमेदवारांचे औक्षण करून पुष्पहार अर्पण करत स्वागत केले, तर ज्येष्ठ नागरिकांनी शुभेच्छा व आशीर्वाद दिले. नागरिकांच्या या प्रतिसादामुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, प्रचाराला अधिक बळ मिळाले आहे.
उमेदवारांनी स्थानिक प्रश्नांवर नागरिकांशी सविस्तर चर्चा करत रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि नागरी सुविधांबाबतच्या अडचणी जाणून घेतल्या. आगामी काळात विकासाभिमुख कामांना प्राधान्य दिले जाईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. या प्रचार फेरीत प्रफुल देवकर, सुरेखा नितीन तायडे यांच्यासह नितीन सपके, रोहिदास पाटील, मधुकर पाटील, दीपक भोसले, ललित देशमुख, अतुल जाधव, अमोल पाटील, रवि पाटील, धवल पाटील, तन्मय चौधरी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या जयघोषाने संपूर्ण प्रभाग दणाणून गेला होता.
