Friday, June 20, 2025
HomeBlogमहायुती मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर ; फडणवीसांकडे गृह, शिंदेंकडे नगर विकास तर अजित...

महायुती मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर ; फडणवीसांकडे गृह, शिंदेंकडे नगर विकास तर अजित पवारांकडे अर्थ खातं !,

जिल्ह्यातील गिरीश महाजनांकडे जलसंपदा, गुलाबराव पाटलांकडे पाणीपुरवठा आणि संजय सावकारे यांच्याकडे वस्त्रोद्योग खाते

मुंबई वृत्तसंस्था ;– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप अखेर जाहीर झाले आहे. देवेंद्र फडणवीसांनी गृह खातं स्वतःकडेच ठेवले असून एकनाथ शिंदेंना नगर विकास आणि अजित पवारांना अर्थ खातं देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नागपूरमध्ये रविवारी (15 डिसेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यावेळी 33 कॅबिनेट मंत्र्यांनी आणि 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. त्यांनाही खाती वाटप करण्यात आली.

खातेवाटप रखडल्याने नागपूरच्या संपूर्ण हिवाळी अधिवेशनात सगळे बिनखात्याचे मंत्री ठरले होते. अखेर आज (21 डिसेंबर) खाते वाटप जाहीर करण्यात आले.

कॅबिनेट मंत्री

1) देवेंद्र फडणवीस – गृह, ऊर्जा, कायदा आणि न्यायव्यवस्था
2) एकनाथ शिंदे – नगरविकास, गृहनिर्माण
3) अजित पवार – अर्थ, राज्य उत्पादन
4) चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
5) राधाकृष्ण विखे- पाटील – जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे)
6) हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
7) चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री
8) गिरीश महाजन – जलसंपदा (विदर्भ, तापी आणि कोकण)
9) गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा आणि स्वच्छता
10) गणेश नाईक – वनमंत्री
11) दादा भुसे – शालेय शिक्षण
12) संजय राठोड – जलसंधारण
13) धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा
14) मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास
15) उदय सामंत – उद्योग आणि मराठी भाषा
16) जयकुमार रावल – मार्केटिंग आणि प्रोटोकॉल
17) पंकजा मुंडे – पर्यावरण आणि हवामान बदल, पशुपालन
18) अतुल सावे – ओबीसी, डेअरी विकास आणि अक्षय ऊर्जा

19) अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
20) शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
21) आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान
22) दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
23) अदिती तटकरे – महिला व बालविकास
24) शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम
25) माणिकराव कोकाटे – कृषी
26) जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
27) नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
28) संजय सावकारे – कापड (वस्त्रोद्योग)
29) संजय शिरसाट – सामाजिक न्याय
30) प्रताप सरनाईक – वाहतूक
31) भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन
32) मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
33) नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
34) आकाश फुंडकर – कामगार
35) बाबासाहेब पाटील – सहकार
36) प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
राज्यमंत्री (State of Ministers)

1) आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, कृषी, मदत आणि पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार
2) माधुरी मिसाळ – शहर विकास, वाहतूक, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
3) पंकज भोयर – गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शाळा शिक्षण, सहकार, खाण
4) मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, एनर्जी, महिला आणि बालकल्याण
5) इंद्रनील नाईक – औद्योगिक, उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
6) योगेश कदम – गृह (शहर), महसूल, ग्रामविकास आणि पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषधे प्रशासन

ताज्या बातम्या