Thursday, May 7, 2026
Homeताज्या बातम्यानिवडणूक आयोग व जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे गृहमतदान मोहीम

निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे गृहमतदान मोहीम

ज्येष्ठ नागरिक सेवादास दलुभाऊंनी बजावला मतदानाचा हक्क

जळगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्र विधानसभेचे मतदान येत्या २० नोव्हेंबर रोजी होत आहे. निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांच्या घरी जाऊन मतदान घेण्याची मोहीम सुरू झाली आहे.  १३ नोव्हेंबर रोजी जळगाव शहर मतदार संघात जैन परिवारातील ज्येष्ठ सदस्य सेवादास दलिचंद जैन (वय ९४ वर्षे) यांच्या गृहमतदानाने या मोहीमेस आरंभ झाला.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने मतदानाचा टक्का वाढवावा त्यादृष्टीने दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी गृह मतदानाची मोहीम १३ व १४ नोव्हेंबर दरम्यान राबविली जात आहे. मतदारांनी येत्या २० रोजी आपला मतदानाचा हक्क अवश्य बजवावा असेही आवाहन करण्यात आले.

लोकशाही बळकटीसाठी उत्तम पर्याय- दलिचंद जैन

येत्या २० रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत वयोवृद्ध, दिव्यांग यांना मतदान कसे करता येईल याबाबत संभ्रम होता परंतु, निवडणूक आयोगाने घेतलेल्या स्तुत्य निर्णयामुळे वयोवृद्ध, दिव्यांग बांधवांना घरबसल्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. ही बाब म्हणजे लोकशाही बळकटीसाठी उचलेले उत्तम पाऊल होय. निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त करतो असे दलिचंद जैन म्हणाले.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या