Thursday, May 7, 2026
Homeक्राईमबारदान कंत्राटदाराकडून पाच हजारांची लाच स्वीकारणाऱ्या दोघांना अटक

बारदान कंत्राटदाराकडून पाच हजारांची लाच स्वीकारणाऱ्या दोघांना अटक

जळगाव : –पाच हजार रुपयांची लाच एरंडोल येथील शासकीय गोदामातून रिकामे बारदान खरेदी करणा-या कंत्राटदाराकडून घेणा-या खासगी इसमास एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले आहे. या लाच प्रकरणी गोदामाच्या अव्वल कारकुनासह लाच स्विकारणा-या खासगी इसमास एसीबी पथकाने ताब्यात घेतले आहे.
नंदकिशोर रघुनाथ वाघ, वय 47 वर्षे, व्यवसाय नोकरी , गोदाम व्यवस्थापक (अव्वल कारकून ) शासकीय गोदाम, एरंडोल . रा . श्रीराम कॉलनी, बालाजी शाळेच्या मागे, हमजेखान महेमुदखान पठाण , वय 39, धंदा – मुकादम, रा सैय्यद मोहल्ला मारवाडी गल्लीच्या मागे , एरंडोल या दोघांविरुद्ध एरंडोल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील तक्रारदारास शासकीय गोदामातून रिकामे बारदान विकत घेण्याचे कंत्राट जिल्हाधिकारी जळगाव कार्यालयाकडून मिळाले आहे. तक्रारदार यांनी नियमानुसार रिकाम्या बारदानांची एरंडोल येथील गोडावून मधून उचल केल्यानंतर अव्वल कारकुन आणि खासगी इसम या दोघांनी तक्रारदाराची इच्छा नसतांना त्यांना सातशे अतिरिक्त रिकामे बारदान दिले. त्या बदल्यात सुरुवातीला सात हजार रुपयांची मागणी केली. सात हजार रुपये न दिल्यास कंत्राट रद्द करण्यासह भविष्यात कंत्राट मिळू देणार नाही अशी धमकी दिली. या प्रकरणी तक्रारदाराने एसीबी कडे तक्रार दिली.

दोघांनी तक्रारदारास दिलेल्या अतिरिक्त बारदानाच्या मोबदल्यात सुरुवातीला सात हजार, नंतर सहा हजार व नंतर 5 हजार 550 रुपयांची लाचेची तडजोड मागणी केली. अखेर पाच हजार रुपये स्विकारण्याची तयारी दर्शवली. 13 नोव्हेंबर रोजी खासगी इसम तथा कंत्राटदार मुकादम यास तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्विकारतांना एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले.

अव्वल कारकुनासह खासगी इसमाला ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध एरंडोल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सापळा परिवेक्षणअधिकारी तथा पोलिस उप अधिक्षक योगेश ठाकूर, सापळा व तपास अधिकारी तथा पोलिस निरीक्षक श्रीमती स्मिता नवघरे आदींच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथकातील पोलिस उप निरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पोकॉ राकेश दुसाने आदींनी हि कारवाई केली .

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या