Saturday, May 16, 2026
Homeखानदेशजळगावचा पारा ४२.४ अंशांवर; उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा

जळगावचा पारा ४२.४ अंशांवर; उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा

जळगावचा पारा ४२.४ अंशांवर; उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा

हवामान विभागाकडून पुढील दोन दिवस ४३ अंशांपर्यंत तापमानाचा अंदाज; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

जळगाव : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जाणवणाऱ्या उष्णतेच्या तीव्रतेत काहीसा बदल दिसून आला असून शुक्रवारी कमाल तापमान ४२.४ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली. तर किमान तापमानही २८.८ अंशांवर स्थिर राहिले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असून दि. १६ रोजी तापमान ४३ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर मात्र हळूहळू तापमानात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
१७ मेपासून उष्णतेच्या तीव्रतेत काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता असून १८ ते २१ मे या कालावधीत कमाल तापमान ३९ ते ४० अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

दरम्यान, वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे तसेच उष्माघातापासून संरक्षण करण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणांकडून करण्यात आले आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या