Sunday, June 15, 2025
Homeक्राईमजळगाव शहरात विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल...

जळगाव शहरात विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल…

जळगाव-पती बाहेरगावी गेल्यानंतर घरात एकट्या असणाऱ्या विवाहितेने आठ वर्षीय मुलीला गळफास देऊन स्वतः देखील गळफास घेत टोकाचा निर्णय घेतल्याची धक्कादायक घटना शहरातील हरी विठ्ठल नगर परिसरात उघडकीस आली असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

याबाबत रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोनाली दीपक दाभाडे वय 36 आणि तेजस्विनी दीपक दाभाडे वय 8 अशी मयत आई आणि मुलीचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की फॅब्रिकेशनचा व्यवसाय करणारे दीपक दाभाडे हे आपल्या पत्नी आणि मुलीसह शहरातील हरी विठ्ठल नगर येथे तिसऱ्या मजल्यावर दोन भावांसह वास्तव्याला आहेत. आज त्यांचे नातेवाईक वारल्याने ते भुसावळ येथे सकाळी निघून गेले. यावेळी घरात एकटे असणाऱ्या सोनाली दीपक दाभाडे आणि त्यांची मुलगी तेजस्विनी दीपक दाभाडे हे घरातच असताना सोनाली दाभाडे यांनी स्कार्फच्या साह्याने मुलीला गळफास देऊन स्वतः दुसऱ्या स्कार्पने गळफास घेत आत्महत्या केली.

दरम्यान आज दुपारी 24 रोजी दीपक दाभाडे हे बारा वाजेच्या सुमारास घरी आले असता त्यांना घराचा दरवाजा आतून बंद असलेला दिसून आला. त्यांनी धक्का मारून दरवाजा उघडला असता त्यांना दोघे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. नातेवाईकांच्या मदतीने त्यांना जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या ठिकाणी जमलेल्या नातेवाईकांनी दोघांच्या मृत्यूबद्दल एकच आक्रोश केला.

घटनेबाबत रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मूर्तीची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

 

 

ताज्या बातम्या