Wednesday, April 22, 2026
Homeक्राईमनवनियुक्त पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वीकारला जळगाव पोलिस अधीक्षक पदाचा पदभार 

नवनियुक्त पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वीकारला जळगाव पोलिस अधीक्षक पदाचा पदभार 

नवनियुक्त पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वीकारला जळगाव पोलिस अधीक्षक पदाचा पदभार 

आज मावळते पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना  निरोप  तर श्रीकांत धिवरे  यांचा स्वागत समारंभ

जळगाव | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे नवनियुक्त पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मंगळवार, दि. २१ एप्रिल रोजी अधिकृतपणे पदभार स्वीकारत जिल्हा पोलिस दलाची सूत्रे हाती घेतली. यावेळी मावळते पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना औपचारिक निरोप देण्यात आला असून, त्यांच्या कार्यकाळातील कायदा-सुव्यवस्था राखणे आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यात आला.

पदभार स्वीकारल्यानंतर नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे पोलिस अधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी जिल्हा पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यास प्राधान्य दिले जाईल, तसेच अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करून गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

आज डॉ. महेश्वर रेड्डी यांना निरोप तर श्रीकांत धिवरे  यांचा स्वागत समारंभ 

जळगाव जिल्हा पोलिस दलात नेतृत्व बदलाच्या पार्श्वभूमीवर मावळते पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचा निरोप समारंभ तसेच नूतन पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचा स्वागत समारंभ आज, बुधवार दि. २२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
हा समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन सभागृह,  येथे पार पडणार असून, जिल्हा प्रशासन व पोलिस दलाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आपल्या कार्यकाळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत गुन्हेगारी नियंत्रणासाठी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचा यावेळी सन्मानपूर्वक गौरव केला जाणार आहे. तसेच नवनियुक्त पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे औपचारिक स्वागत करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात येणार आहेत.
या समारंभास जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी, तसेच मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

 

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या