विजयाचे दावे कायम; उत्कंठा सर्वांनाच लागून
जळगाव :- महाराष्ट्रातील सर्व विधानसभा जागांचे निकाल जाहीर होत यातजळगाव शहर विधानसभा मतदार संघाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असून निवडणुकीत कोण बाजी मारणार याविषयी उत्कंठा सर्वांनाच लागून राहिलेली आहे. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढतीचे चित्र दिसून येत आहे. यात विद्यमान आमदार राजू मामा भोळे माजी महापौर जयश्रीताई महाजन अपक्ष उमेदवार माजी उपमहापौर अश्विन भाऊ सोनवणे आणि माजी उपमहापौर कुलभूषण पाटील हे प्रमुख दावेदार असलेले उमेदवार रिंगणात उभे आहेत. प्रत्येकाने जळगाव शहराच्या विकासाकरिता काय सुविधा देता येईल याचा आपल्या प्रचारात जळगावकर मतदारांना आश्वासन दिले आहे. भाजपाने तिसऱ्यांदा आमदार राजू मामा भोळे यांना संधी दिली आहे. तसेच उद्धव ठाकरे गटातर्फे माजी महापौर जयश्री महाजन यांना उमेदवारी मिळाली होती. तसेच भाजप चे माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. उद्धव ठाकरे गटाचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील हे सुद्धा अपक्ष उमेदवारी करून रिंगणात आहेत. सर्वच उमेदवारांनी विजयाचे दावे केले आहेत. जळगाव शहरातील रस्ते गटारी यासह मूलभूत सोयी सुविधा मिळवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने आपापल्या प्रचारामध्ये आवाहन करून जळगावकरांचे लक्ष प्रचार रॅली द्वारे शक्तिप्रदर्शन करीत वेधून घेतले होते.
विद्यमान आमदार असलेले राजू मामा भोळे हे तिसऱ्यांदा निवडून येतात की जयश्रीताई महाजन बाजी मारतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. विजयाचे दावे सर्वच उमेदवार यांनी केले असले तरी शेवटी कोण विजय होणार हे आजच्या निकालातून स्पष्ट होणार आहे.