Thursday, May 7, 2026
Homeखानदेशसंभाव्य पालक मंत्र्यांची यादी आली समोर; पहा कोणत्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री?

संभाव्य पालक मंत्र्यांची यादी आली समोर; पहा कोणत्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री?

मुंबई वृत्तसंस्था ; – महायुतीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघा नेत्यांची पालकमंत्री पदाबाबत चर्चा झाली असून संभाव्य यादी समोर आले आहे. यात काही ठिकाणी महायुतीच्या नेत्यांनी दावा केला आहे. जळगाव जिल्ह्यासाठी गुलाबराव पाटील यांच्यासह भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी देखील दावा केला असून नाशिकच्या पालकमंत्री पदी गिरीश महाजन अथवा शिवसेनेचे दादा भुसे यांची नावे चर्चेत आहे.

जिल्हा निहाय संभाव्य पालकमंत्र्यांची नावे

ठाणे एकनाथ शिंदे, पुणे अजित पवार, बीड अजित पवार, नागपूर चंद्रशेखर बावनकुळे, सांगली शंभूराज देसाई, सातारा शिवेंद्रराजे भोसले, संभाजीनगर संजय शिरसाट किंवा अतुल सावे, जळगाव गुलाबराव पाटील भाजपचा देखील या जागेवर दावा आहे, यवतमाळ संजय राठोड, कोल्हापूर हसन मुश्रीफ, अहिल्यानगर राधाकृष्ण विखे पाटील, अकोला माणिकराव कोकाटे, अमरावती चंद्रकांत पाटील, भंडारा अजित पवार, बुलढाणा आकाश फुंड कर, चंद्रपूर नरहरी झिरवळ, धाराशिव धनंजय मुंडे, धुळे जयकुमार रावल, गडचिरोली एकनाथ शिंदे,, गोंदिया अजित पवार, हिंगोली आशिष जयस्वाल, लातूर गिरीश महाजन, मुंबई शहर योगेश कदम, मुंबई उपनगर मंगल प्रभात लोढा, नांदेड भाजपचा दावा, नंदुरबार भाजप, नाशिक दादा भुसे, गिरीश महाजन, जालना अतुल सावे लातूर बाळासाहेब पाटील, वर्धा पंकज भोयर , पालघर गणेश नाईक, परभणी मेघना बोर्डीकर, रायगड भरत गोगावले आणि राष्ट्रवादी,रत्नागिरी उदय सामंत, सिंधुदुर्ग नितेश राणे, आधी नावे समोर आले असून काही ठिकाणी महायुतीमध्ये तिढा निर्माण झाला आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या