Wednesday, February 4, 2026
Homeखानदेशशहर विकासाला गती देण्यासाठीच महायुतीला विजयी करा; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन

शहर विकासाला गती देण्यासाठीच महायुतीला विजयी करा; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन

शहर विकासाला गती देण्यासाठीच महायुतीला विजयी करा; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन

पिंप्राळ्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचंड जाहीर सभा; बिनविरोध विजयी उमेदवारांचा गौरव

जळगाव (प्रतिनिधी): “आपल्या पुढच्या पिढीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि जळगावच्या प्रगतीला नवी उंची देण्यासाठी भाजपा-महायुती पूर्णपणे कटिबद्ध आहे. जळगाव शहराच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती द्यायची असेल, तर महायुतीशिवाय पर्याय नाही. कार्यकर्त्यांनी आता घराघरात स्नेह आणि विकासाचा हा संदेश पोहोचवून जळगावला अधिक समृद्ध बनवण्यासाठी सज्ज व्हावे,” असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले.

जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने रविवारी, ४ जानेवारी रोजी पिंप्राळा येथे आयोजित भाजपा-महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेच्या माध्यमातून महायुतीने शहरात मोठे शक्तीप्रदर्शन करत विजयाचा निर्धार केला. सभेच्या सुरुवातीला जळगाव महानगरपालिकेत महायुतीकडून बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार मंगेश चव्हाण, आमदार सुरेश (राजू मामा) भोळे, आमदार किशोर आप्पा पाटील, भाजप प्रदेश महामंत्री रवी अनासपुरे, शहर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह महायुतीचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.

रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरताना सांगितले की, महायुतीचे सरकार विकासकामांच्या जोरावर जनतेसमोर जात आहे. हा विश्वास प्रत्येक जळगावकराच्या मनापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. या सभेला जळगाव महानगरपालिका निवडणुकीतील भाजपा-महायुतीचे सर्व ७५ उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जाहीर सभेमुळे जळगावातील राजकीय वातावरण पूर्णपणे महायुतीमय झाले असून प्रचाराला मोठी गती मिळाली आहे.

ताज्या बातम्या