प्रभाग क्रमांक ३ मध्ये चैताली रवींद्र ठाकरे यांच्या प्रचाराचा जोरदार धडाका
घरकुलसह पाणी, रस्ते, गटार व स्वच्छतेवर भर; मतदारांचा वाढता विश्वास
जळगाव (प्रतिनिधी) : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३ (ब) मध्ये अपक्ष उमेदवार चैताली रवींद्र ठाकरे यांच्या प्रचाराने वेग घेतला असून, परिसरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद, नागरिकांच्या समस्या जाणून घेणे आणि छोट्या-मोठ्या प्रचार सभांच्या माध्यमातून त्यांनी आपला प्रचार अधिक प्रभावी केला आहे.
प्रचारादरम्यान पात्र असूनही घरकुल योजनेपासून वंचित राहिलेल्या गरजू कुटुंबांना घरकुलचा लाभ मिळवून देण्यासाठी ठोस प्रयत्न करणार असल्याची ग्वाही चैताली ठाकरे यांनी दिली. यासोबतच प्रभागातील पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, गटार व्यवस्था, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा या मूलभूत प्रश्नांवर विशेष लक्ष देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांच्या अडचणी शांतपणे ऐकून घेत ठोस विकासाभिमुख भूमिका मांडल्यामुळे त्यांना परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच युवक वर्गामध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून, “सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारा आणि काम करणारा प्रतिनिधी हवा,” अशी भावना मतदारांमध्ये बळावताना दिसत आहे.
एकूणच प्रभाग क्रमांक ३ मध्ये चैताली रवींद्र ठाकरे यांच्या प्रचारामुळे राजकीय हालचालींना वेग आला असून, विकासकेंद्री आश्वासनांमुळे त्यांची उमेदवारी दिवसेंदिवस अधिक मजबूत होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
