Thursday, May 7, 2026
Homeशैक्षणिकनूतन मराठा महाविद्यालय आणि सोयो सिस्टीम यांच्यात सौरऊर्जा क्षेत्रातील सामंजस्य करार

नूतन मराठा महाविद्यालय आणि सोयो सिस्टीम यांच्यात सौरऊर्जा क्षेत्रातील सामंजस्य करार

नूतन मराठा महाविद्यालय आणि सोयो सिस्टीम यांच्यात सौरऊर्जा क्षेत्रातील सामंजस्य करार

जळगाव (प्रतिनिधी) –जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयाने सौरऊर्जा क्षेत्रातील नामांकित कंपनी सोयो सिस्टीम यांच्याशी सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार, महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, ऑन-जॉब ट्रेनिंग व सौरऊर्जेशी संबंधित उत्पादने व तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळणार आहे.

या सामंजस्य करारावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख आणि सोयो सिस्टीमचे प्रोप्रायटर किशोर ढाके यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाला चालना मिळणार असून, उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी प्राप्त होणार आहे.

कंपनीचे मॅनेजर प्रशांत सरोदे हे विद्यार्थ्यांना सौरऊर्जा संबंधित विविध उपकरणांवर हाताळणी प्रशिक्षण (On-Job Training) देणार आहेत.
प्रोप्रायटर किशोर ढाके यांनी याबाबत बोलताना सांगितले की, “विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानासोबतच व्यावसायिक अनुभव मिळावा, यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल.”

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या