Tuesday, April 21, 2026
Homeजळगाव जिल्हामुलगा दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी

मुलगा दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी

मुलगा दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी

जळगाव प्रतिनिधी I रामेशवर कॉलनी भागात आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास घराच्या दुसर्या मजल्यावरून पतंग उडविणार्या ७ वर्षीय बालकाचा तोल जाऊन खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना घडली . जखमी मुलाला रॅम नगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे . श्लोक कैलास गिरगुणे असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, रामेश्वर कॉलनी परिसरात असणाऱ्या सिद्धिविनायक मंदिराजवळ श्लोक कैलास गिरगुणे हा मुलगा त्याच्या जुळ्या भावासोबत आज 14 जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरून पतंग उडवीत असताना त्याचा तोल गेल्याने तो खाली पडला. यावेळी तो गंभीर जखमी झाल्याने कुटुंबीयांनी जळगाव शहरातील रामनगर मध्ये असणाऱ्या सारा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या