Thursday, April 30, 2026
Homeजळगाव जिल्हाशाळेच्या १०० मिटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई

शाळेच्या १०० मिटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई

जळगाव  शाळांच्या 100 मीटर परिसरात  तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणान्यांवर शनिपेठ पोलीसांनी अतिक्रमण विभागाच्या मदतीने कारवाई केली. या कारवाईत सहा टपरी चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांच्या पान टपऱ्या कायमस्वरुपी हटवून त्या मनपाच्या अतिक्रमण विभागाने ताब्यात घेतल्या आहेत.

शहरातील शैक्षणिक संस्थांच्या शंभर मिटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिल्या होत्या. त्यानुसार शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ भारबळे, सपोनि साजीद मंसुरी, उपनिरीक्षक योगेश ढिकले, युवराज कोळी, विजय खैरे, गिरीश पाटील, भागवत शिंदे, विकी इंगळे, अनिल कांबळे यांच्या पथकाने पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चौने शाळा, मनपाची १० क्रमांकाच्या शाळेच्या परिसरातील तंबाखूजन्य आहेत.

पदार्थ विक्री करणाऱ्या टपरी चालकांवर यापूर्वी दंडात्मक कारवाई केली होती. मात्र तरी देखील ते पदाथांची विक्री सुरुच ठेवल्यामुळे गुरुवारी या शाळांच्या शंभर मिटर परिसराच्या आत असलेल्या सहा टपरी चालकांवर मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या मदतीने कारवाई करुन त्या जप्त करण्यात आल्या

यांच्यावर झाली कारवाई या कारवाईमध्ये चौथे शाळेजवळील इकबाल शेख उस्मान शेख रा. इस्लामपुरा, शंकर लिंगा गवळी रा. गवळीवाडा, भिका लिंगा गवळी रा. गवळीवाडा, गणी मोहमद डिगी रा. मिलपुरा तर मनपाच्या १० नंबर शाळेच्या परिसरातील प्रकाश नामदेव पाटील रा. बळीराम पेठ, अब्दुल करीम शेख इसा रा. काट्याफाईल यांच्याविरुद्ध कारवाई करुन त्यांची टपरी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच पुढील दोन दिवसात इतर शाळांच्या हद्दीतील पानटपरी चालकांवर कारवाई करण्याचा इशारा शनिपेठ पोलिसांनी दिला

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या